Aurangzeb Controversy : औरंगजेब खलनायक, त्याची पिल्लावळ संपवली पाहिजे : मुख्यमंत्री शिंदे

Aurangzeb Controversy : औरंगजेब खलनायक, त्याची पिल्लावळ संपवली पाहिजे : मुख्यमंत्री शिंदे

पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा औरंगजेबच्या स्टेटस ठेवण्यावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं. 'औरंगजेबाचा महिमा गाणाऱ्यांना
सोडणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत म्हणाले. फोटो झळकावणाऱ्यांची माहिती पोलिसांना मिळाली असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत असंही फडणवीस म्हणाले. तर दुसरीकडे विधानसभेत मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या अंतिम आठवडा प्रस्तावात औरंगजेबची पिल्लावळं संपवली पाहिजे अशा शब्दात जोरदार हल्लाबोल केला. तर विधानसभेतील चर्चांवर प्रकाश आंबेडकरांनी मात्र स्टेटसचं समर्थन केलं. स्टेटस ठेवणं काही गुन्हा होऊ शकत नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola