Pune : पुण्यात महापालिकेनं बनवलेला सायकल ट्रॅक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकानंच उखडला
Continues below advertisement
पुण्यात हडपसरमध्ये महापालिकेनं बनवलेला सायकल ट्रॅक एका नगरसेवकानंच उखडून टाकल्याची घटना घडली आहे. वाहतुकीला अडथळा ठरत असल्यानं सायकल ट्रॅक उखडल्याचा दावा नगरसेवकानं केला आहे. उड्डाणपुलाजवळ असलेला हा सायकल ट्रॅक काढून टाकण्याची मागणी नगरसेवक योगेश ससाणे यांनी महापालिकेकडे केली होती, पण महापालिकेनं त्याकडे लक्ष न दिल्यामुळे अखेर ससाणे यांनीच जेसीबी लावून हा ट्रॅक उखडला आहे.
Continues below advertisement