PUNE : राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक दत्तात्रय वारे यांचं पुणे जिल्हा परिषदेकडून निलंबन
पुणे जिल्ह्यात वाबळेवाडीसारख्या छोट्या गावात आंतरराष्ट्रीय शाळा उभारणारे आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेनं निलंबित केलंय. स्थानिक राजकारणातून या शिक्षकाचं निलंबन झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केलाय.