Raju Sapte यांच्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी 'स्पेशल प्लॅन'; पोलीस दलातील वरिष्ठांची ऑनलाईन बैठक

Continues below advertisement

कलादिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केल्यानंतर मनोरंजनसृष्टीत असलेली युनियन्सची मक्तेदारी उजेडात आली आहे. राजू सापते यांनी व्हिडीओमध्ये राकेश मौर्य यांचं नाव घेतलं आहे. पण त्यांनी लिहिलेल्या पत्रात राकेश यांच्यासह नरेश विश्वकर्मा, गंगेश्वर श्रीवास्तव यांच्या नावाचा उल्लेखही राजू यांनी केला आहे. या तिघानी त्रास दिल्याचा उल्लेख पत्रात केला आहे. सापते यांची आत्महत्या झाल्यानंतर पाच दिवस उलटूनही अद्याप त्यांनी उल्लेख केलेल्या लोकांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. अपवाद नरेश विश्वकर्मा यांचा. पण आता पोलिसानी यासाठी स्पेशल एक्शन प्लॅन तयार केला आहे. आज मनोरंजसृष्टीच्या समितीसोबत केलेल्या विशेष झूम बैठकीत याची चर्चा झाली आणि काही निर्णय घेतले गेले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram