Mumbai Vaccination : मुंबईत आज लसीकरण बंद; BMC कडून मुंबईकरांना सहकार्य करण्याचं आवाहन

Mumbai Vaccination : देशासह राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होताना दिसत आहे. अशातच तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत असून यापार्श्वभूमीवर देशभरात लसीकरण मोहीमेनं वेग धरला आहे. परंतु, पुरेशा लसींच्या साठ्याअभावी लसीकरण मोहीमेत अडथळे येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही पुरेशा साठ्याअभावी लसीकरण मोहीमेमध्ये अनेक अडथळे येत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज दिनांक 9 जुलै, 2021 रोजी मुंबईतील शासकीय आणि महापालिका केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. 

कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर आज (शुक्रवार) दिनांक 9 जुलै 2021 रोजी लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola