MPSC Student Pune : जुन्या परीक्षा पद्धतीसाठी विद्यार्थी आग्रही, एमपीएसी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन कालपासून सुरू आहे... नवी परीक्षा पद्धती २०२५ पासून लागू करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी एमपीएससीचे
विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान, भाजपचे अभिमन्यू पवार यांनी विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद करवून दिलाय... कालही आंदोलनस्थळावरील स्ट्रीट लाईट बंद करण्यात आले होते. त्यावेळी आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्च लावत आंदोलन सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळालं.