Pune :आईच्या आजारपणासाठी प्रवाशांच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

Continues below advertisement

पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आलीय.ड्रग्सच्या आहारी गेलेला अन आईच्या आजार पणासाठी पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला बंडगार्डन पोलीसांनी अटक केली आहे.त्याचा जन्म अमेरिकेत झालेला आहे. तो सदन घरातील आहे. परंतु, पैशांसाठी तो चोऱ्या करत असल्याचे समोर आले आहे. नोएल शबान (वय २३) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.पुणे स्टेशन, ससून रुग्णालय तसेच रेल्वे स्थानक परिसरात परराज्यातून नागरिक येत असतात.तर, पुण्याच्या विविध भागात जाण्यासाठी येथून पीएमपीएल असतात.त्यामुळे येथे दिवसभर मोठी वर्दळ असते.तरीही या भागात प्रवाशांचे मोबाईल हिसकावून नेल्याच्या घटना सतत घडत असत. त्यामुळे बंडगार्डन पोलीसांकडून या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी गस्त व पेट्रोलिंग करत होते.दरम्यान एका गुन्ह्याचा तपास सुरू होता. त्यात पोलीसांनी तब्बल या भागातील 150 शासकीय आणि खासगी असे दोनशेहून अधिक सीसीटीव्ही पडताळले.त्यात नोएल दिसून आला. त्यानुसार त्याचा शोध घेतला जात होता.त्याला पकडले व चौकशी केली असता त्यावेळी त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली.त्याला अटक करत सखोल तपास केला असता त्याने अनेक गुन्हे केल्याचे दिसून आले. त्याच्याकडून तब्बल 18 मोबाईल व चार दुचाकी जप्त केल्या आहेत.  नोएलवर यापुर्वीचे 14 गुन्हे दाखल आहेत.तो ड्रग्सच्या आहारी गेलेला आहे.तर,आई आजारी असते. वडिलांचे निधन झालेले आहे. वडिलांवर खूनाचा गुन्हा दाखल होता. 
नोएल याची आजी अमेरिकेतील न्यूयार्क शहरात असते. त्यांचे तेथे मॉल्स आहेत. तर, पुण्यात देखील घर आहे. नोएलचा जन्म अमेरिकेत झाला होता. पाच वर्ष त्याला आजीने सांभाळले होते. त्यानंतर वडिलांनी त्याला पुण्यात आणले होते... मात्र आता त्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. आणि आता त्याला येरवडा जेलमध्ये जावे लागणार आहे .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram