Pune PM Narendra Modi Temple : पुण्यातल्या मोदींच्या मंदिरात राष्ट्रवादीची हटके आरती ABP Majha

पुण्यात उभारण्यात आलेल्या मोदी मंदिराची देशभर चर्चा झाली.. मोदीभक्त मयूर मुंडे या भाजपच्या कार्यकर्त्यानं औंध परिसरात मंदिर उभारलं, मात्र मंदिर उभारून दोन दिवस उलट नाही तोच, मोदींचा पुतळा रातोरात हलवण्याची वेळ ओढवलीय.. पुतळा कुणी आणि का नेला असा प्रश्न पोलिसांना पडला. पण सकाळी त्याचं उत्तर मिळालं. इंधनाचे दर कमी करा असं साकडं घालण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोदी मंदिरात दाखल झाले. पण मंदिरात पुतळाच नव्हता. मंदिरातील मोदींचा पुतळा एका नगरसेवकाच्या कार्यालयात नेऊन ठेवल्याचं कळतंय. राष्ट्रवादीच्या आंदोलनाची कुणकुण लागल्यानंच पुतळा हटवण्यात आला असावा अशी चर्चा त्यामुळे सुरू झालीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola