Pune Robbery : पुण्यात दिवसाढवळ्या धाडसी दरोडा, दरोडेखोरांच्या गोळीबारात एक गंभीर जखमी
पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील कांदळी गावातील अनंत पतसंस्थेत आज दुपारच्या सुमारास दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात 1 जण गंभीर जखमी झाला आहे. अनंत पतसंस्थेत दोन अज्ञात घुसले आणि त्यांनी मॅनेजरकडे पैशांची मागणी केली.. पण पैसे देण्यास नकार देताच दरोडेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक बँक कर्मचारी गंभीर जखमी झाला. या घटनेत 2 ते अडीच लाखांची रोकड चोरट्यांनी लांबवली. पोलिसांकडून सध्या दरोडेखोरांचा शोध सुरु आहे.