Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

Continues below advertisement

Makrand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...   


शेतकऱ्यांनी शेतीची पद्धत बदलावी तसेच सामूहिक शेती सुरू करावी.  शेतमालाच बार्गेनिंग केलं जातं परंतु एखादा मॉलमध्ये वस्तू घेताना बर्गेनिंग केलं जातं नाही.  परंतु शेतकऱ्याचा माल आहे म्हटलं की त्याची बार्गेनिंग सुरू होते.  शेतकऱ्याकडे पिकवायची क्षमता आहे. पण साठवून ठेवू शकत नाही म्हणून कवडीमोल भावाने शेत माल त्याला विकावा लागतो अशी खंत देखील मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.  सरकारने देखील शेतकऱ्यांच्या मालाचा हमीभाव ठरवला पाहिजे अशी मागणी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केली आहे.  बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रातील कृषी प्रदर्शनाच्या पाहणी मकरंद अनासपुरे यांनी केली.   तसेच अभिनेता सैफ अली खानच काय कुणावरही अशा पद्धतीचा हल्ला झाला तर त्याचा निषेधच आहे.  या प्रकरणची चौकशी होऊन कडक असे शासन झालं पाहिजे अशी मागणी देखील मकरंद अनासपुरे यांनी केली.  तसेच महाराष्ट्र हा जातीपातीत वाटून चालणार नाही सगळ्यांनी एकत्र राहूनच काम केलं पाहिजे अशी देखील भावना मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली. मकरंद अनासपुरे यांच्याशी बातचीत केले आमचा प्रतिनिधी जयदीप भगत याने

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram