Maharashtra Wrestling : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत वादाचा आखाडा, स्पर्धेसाठी दोन्ही गटांचा पुढाकार
Continues below advertisement
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अधिकारावरून दोन गटात वाद सुरु आहे. बाळासाहेब लांडगे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणी बरखास्त करण्याचा भारतीय कुस्तीगीर महासंघाचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं न्यायालयानं म्हटल्याचा दावा लांगडे यांनी केलाय. त्यामुळे २० ते २४ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धा आपणच भरवू असं त्यांनी जाहीर केलंय. तर रामदास तडस यांच्या नेतृत्वाखालील संघटनेनंही त्यांचीच कार्यकारिणी स्पर्धा भरवेल असं म्हटलंय. या पार्श्वभूमीवर आज दोन्ही गटांनी पत्रकार परिषदेचं आवाहन केलंय.
Continues below advertisement