Maharashtra Drought : Sharad Pawar VS Devendra Fadnavis यांचे दुष्काळावरुन आरोप प्रत्यारोप

Maharashtra Drought : Sharad Pawar VS Devendra Fadnavis यांचे दुष्काळावरुन आरोप प्रत्यारोप

राज्यातील १९ जिल्ह्यात तीव्र दुष्काळ आहे. जवळपास ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. मात्र राज्य सरकारचं तिकडं लक्षच नाही. आम्ही या प्रश्नाकडं सरकारचं लक्ष वेधत आहोत. तरीही सरकार जागं झालं नाही, तर इतर मार्ग आहेत, असा इशारा शरद पवार यांनी आज दिला. तर विरोधक नकारात्मक मानसिकेत गेला असून, राज्य सरकार दुष्काळाबात गंभीरपणे पाहत आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Fadnavis On Dushkal And Sharad Pawar 
शरद पवार आणि विरोधी पक्ष नकारात्मक मानसिकतेत गेले... कारण या दुष्काळात निवडणूक असूनही टँकरची व्यवस्था, पाणी सोडण्याचे निर्णय, पाणी व्यवस्थापन सर्वकाही केला गेला आहे... आणखी महिनाभर या गोष्टी कराव्या लागणार आहे.. त्यासाठी टंचाई बद्दल नियोजन केलंय... स्वतः मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे... सरकार पूर्ण गांभीर्याने दुष्काळ आणि टंचाईकडे लक्ष देत आहे... दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola