Pune Assembly Election : पुण्यावरुन मविआत संघर्ष? ठाकरे गटाचाही पुण्यातील 6 जागांवर दावा

Continues below advertisement

पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र लढण्याची भूमिका आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केली. अगदी त्याचवेळी पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची (Sharad Pawar Camp) बैठक संपन्न झाली व या बैठकीनंतर पुणे (Pune) शहरातील ८ पैकी ६ विधानसभा मतदारसंघात (Vidhansabha Election) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार हवा असा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर कार्यकारिणीची महत्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे पार पडली. पक्षाची असलेली ताकद, उपलब्ध असलेले सशक्त उमेदवार, जिंकून येण्याची खात्री अशा अनेक निकषांवर पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. शहरातील हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कँटोन्मेंट या सहा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार हा विश्वास सर्वानुमते व्यक्त करण्यात आला. 

यासंदर्भातील अहवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवला आहे. या बैठकीस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी खासदार सौ.वंदनाताई चव्हाण, माजी आमदार ॲड. जयदेवराव गायकवाड़, जिल्हा अध्यक्ष माज़ी आमदार श्री. जगनाथबाप्पू शेवाळे, माज़ी आमदार कुमारभाऊ गोसावी, अंकुशराव काकडे, रवींद्र माळवदकर, प्रकाश म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram