Pune Lok Sabha 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास दिग्विजय योद्धा पगडी : ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज पुण्यात रेसकोर्स इथे भव्य सभा होणार आहे. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत. पुणे शहर भाजप आणि जिल्हा भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून एक पगडी तयार करून घेण्यात आलेली आहे. दिग्विजय योद्धा पगडी अस या पगडीला नाव देण्यात आले आहे. नेमकी ही पगडी कशी आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधींनी.