Lockdown in Pune? पुण्यात लॉकडाऊन होणार की कडक निर्बंध लावणार?
पुण्यातील रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होऊ लागल्यानंतर पुण्यातील खाजगी रुग्णालयांमधील 50 टक्के बेड प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात येतील असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं होतं. परंतु, त्यानंतरही खाजगी रुग्णालयांनी दाद न दिल्यानं हे बेड आरोग्य यंत्रणेच्या ताब्यात आलेले नाहीत. तर कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत? याची माहिती देणारा डॅशबोर्डही गेल्या कित्येक दिवसांत अपडेट करण्यात आलेला नाही. त्यामुळे रुग्णांना बेड मिळणं आणखी अवघड झालं आहे.