Pune Lockdown | पुण्यात पुन:श्च लॉकडाऊन! पुणे, पिंपरी-चिंचवडसह हवेली तालुका परिसरात लॉकडाऊन
पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पुण्यात लागू झालेल्या लॉकडाऊनबद्दल एबीपी माझाला माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालय आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. हा लॉकडाऊन पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हवेली तालुका या भागांपुरता मर्यादित असणार आहे, याला 13 तारखेसा मध्यरात्री 12 वाजेपासून सुरुवात होईल आणि 23 तारखेला मध्यरात्री हा लॉकडाऊन संपेल. संपूर्ण दहा दिवसांचा असा हा लॉकडाऊन असेल.