Leopard Attack : पुण्यात तरुणावर बिबट्याचा हल्ला, सीरम इंस्टीट्यूटच्या मागे बिबट्याचा वावर
पुण्यात वॉकला गेलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याचूी घटना घडली आहे. सिरम कंपनीमागे बिबट्याचा वावर असल्याचे बोललं जात असून बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. या तरुणाच्या डाव्या बाजूला बिबट्याचे पंजे लागलेत आहेत आणि हा बिबट्या जवळपास असणाऱ्या पडक्या घरात किंवा झुडपात लपल्याची भीती स्थानिकांनी वर्तवली आहे.