Shailsh Tilak Pune : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळकांना भाजपची उमेदवारी मिळणार?
abp majha web team
Updated at:
02 Feb 2023 05:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशैलेश टिळक यांनी कसबा पेठेतल्या पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र विकत घेतलं आहे. त्यामुळं त्यांनाच भाजपची उमेदवारी मिळणार या चर्चेला उधाण आलं आहे. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ मतदारसंघातून टिळक कुटुंबातील एकाला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी शैलेश टिळक यांनी केली होती. या मतदारसंघातून शैलेश टिळक आणि त्यांचा मुलगा कुणाल टिळक यांच्या नावांची भाजपच्या उमेदवारीसाठी चर्चा आहे. कसबा पेठेतून माजी नगरसेवक धीरज घाटे, हेमंत रासने आणि गणेश बिडकर यांचाही भाजपच्या उमेदवारीवर डोळा आहे.