Pune : पुण्यात Kline Memorial School मध्ये पालकांना बाऊन्सर्सची माराहण
Continues below advertisement
पुण्यातल्या बिबवेवाडीतल्या क्लाईन मेमोरियल शाळेत पालकांवर बाऊन्सर्सनी माराहण केल्याचा आरोप होतोय. त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.. या प्रकरणी मंगेश गायकवाड नावाच्या पालकानं तक्रार केल्यानंतर अदखल पात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय. शाळेच्या मुख्याध्यापकांनी फीसंदर्भात पालकांना बोलावले होते. त्यासाठी पालक शाळेत आले होते. मात्र पालकांचा बाऊन्सरशी वाद झाला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. व्हिडीओमध्ये महिला बाऊन्सर देखील हात का उगारला अशी विचारणा करताना दिसतेय. त्यामुळं त्यांची आणि शाळेची बाजू जाणून घेण्याचा देखील आम्ही प्रयत्न करतोय... दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शाळा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येतोय.
Continues below advertisement
Tags :
ABP Majha LIVE Pune ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Pune School Fight Kline Memorial School