Katraj Park Leopard : कात्रज उद्यानातून पळालेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न
Katraj Park Leopard : कात्रज उद्यानातून पळालेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न पुण्यातील कात्रज भागातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यातून बिबट्या पळाला. पळालेला बिबट्या कात्रज प्राणी संग्रहालयाच्या आवारातच असून त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. हा बिबट्या मानवी वस्तीत शिरु नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी पिंजरे देखील लावण्यात आलेत. पिंजऱ्याचे लोखंडी गज वाकवून तो पळाल्याचा दावा प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाने केलाय. मात्र मजबूत पिंजऱ्यातून बिबट्या बाहेर आल्याने खळबळ उडालीय.