Protest : 'हाॅलमार्किंग युनिक आयडी ही एक विध्वंसक प्रक्रिया', संप पुकारणाऱ्या सराफांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

हॉलमार्क सक्तीविरोधात देशभरातील सराफा व्यावसायिकांनी आज लाक्षणिक संप पुकारलाय. राज्याच्या विविध भागात दुकानं बंद ठेवून सराफा व्यावसायिक या आंदोलनात सहभागी झालेत. सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या जळगावात या आंदोलनामुळे कोट्यवधीची उलाढाल ठप्प झालीय. घडणावळ वाढण्याची भीती व्यक्त करत सराफा व्यावसायिकांनी हॉलमार्कला विरोध केलाय. हॉलमार्किंग युनिक आयडीद्वारे शुद्धता तपासणी ही चुकीची आणि असंवैधानिक असल्याचा आरोप सराफा व्यावसायिकांनी केलाय. तसंच बीआयएसने शुद्धता निकष बदलांमुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांच्या गोपनीयतेला बाधा पोहोचण्याची भीतीही सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram