Shravani Somvar 2021 : श्रावणी सोमवारनिमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट
श्रावणी सोमवारनिमित्त पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. गुलाब, कामिनी, झेंडू इत्यादी फुलांनी केलेल्या सजावटीमुळं विठ्ठलाच्या मंदिराला मोहक आणि सुंगधी रुप लाभलंय. कल्याणचे विठ्ठलभक्त शशिकांत मढवी यांच्यातर्फे ही सजावट सेवा विठ्ठल चरणी अर्पण करण्यात आली आहे.