Jejuri : नववर्षाच्या स्वागतासाठी खंडेरायाच्या जेजुरीत भाविकांनी गर्दी, मास्कचा विसर
नववर्षाच्या स्वागतासाठी खंडेरायाच्या जेजुरीत भाविकांनी गर्दी केलीये. सकाळपासून भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. सकाळपासून हजारो भाविकांनी दर्शन घेतलं आहे.. यावेळी अनेक भाविक हे विनामस्क पाहायला मिळाले.. मंदिर प्रशासनाने वारंवार आवाहन करून देखील भाविक हलगर्जीपणा करताना पाहायला मिळत आहेत.