Pune Terrorist Case : पुण्यातील दहशतवादी आणि रचलेल्या कटाचा तपास आता एटीएसकडून एनआयएकडे जाणार
Continues below advertisement
पुण्यात अटक केलेल्या दहशतवादी आणि त्यांनी रचलेल्या कटाचा तपास आता एटीएसकडून एनआयएकडे सोपवण्यात येणार आहे. यासाठीची न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया आज पूर्ण होईल, अशी माहिती एटीएसमधील सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. या दहशतवाद्यांचे लागेबांधे ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेशी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.
Continues below advertisement