
Pune : पुरंदरमध्ये काका मला मारु नका, जमिनीच्या वादातून पुतण्याला पेटवण्याचा प्रयत्न
इतिहासामध्ये काका मला वाचवा असं आपण वाचलय. पण पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी येथे काका मला मारू नका असं म्हणण्याची वेळ एका पुतण्यावर आलीय. वागदरवाडी येथील काका पुतण्याचं जमिनीवरून वाद आहे . पुतण्या जमिनीत आल्याचे पाहून काकाने चक्क रॉकेल ओतून पुतण्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केलाय. हातामध्ये पेटता टेंभा घेऊन तो पुतण्याच्या अंगावर मारतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. भास्कर त्रिंबक भुजबळ यांनी जमिनीच्या वादातून पुतण्यला रॉकेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी शारदा भुजबळ यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना काल संध्याकाळी घडली. शारदा भुजबळ यांच्या शेतात भास्कर भुजबळ यांनी न विचारता उसाचे पिक घेवुन उस तोड सुरू केलेली. ऊस तोडणीचे काम थांबविण्या करीता फिर्यादी आणि मुलगा स्वप्नील असे गेले असता. भास्कर भुजबळ यांनी सप्नीलच्या अंगावर रॉकेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये स्वप्नील आणि आई शारदा भुजबळ जखमी झाल्या आहेत.. काका विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. जेजुरी पोलिसांनी भा.द.वि.कलम 307, 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पोलीस कोठडी घेतली आहे.