Pranjakl Khewalkar | Pune पार्टी प्रकरणात लैंगिक अत्याचार, खेवलकरांवर गंभीर आरोप
पुण्यातील पार्टी प्रकरणात मानवी तस्करी, लैंगिक अत्याचार आणि अश्लील फोटो-व्हिडिओ प्रकरणावर गंभीर आरोप झाले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमध्ये महिलांचे नग्न फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. "चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने अनेक मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाले आहेत," असा आरोप करण्यात आला. मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅटमध्ये सात मुलींची नावे 'आरुषी' या नावाने सेव करण्यात आली होती. खेवलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून कोकेन आणि गांजा जप्त करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. काही नेत्यांनी माहिती पोलिसांकडूनच यावी, अशी भूमिका मांडली. पिडीत मुलींनी तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.