Uddhav Thackeray Delhi Visit | ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा, केंद्र सरकारवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे दिल्लीत INDIA आघाडीच्या बैठकीसाठी उपस्थित आहेत. देशाच्या राजधानीत ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे. राज ठाकरे महायुतीसोबत जाणार की उद्धव ठाकरेंसोबत हातमिळवणी करणार, याबाबत अजून निर्णय झालेला नाही. उद्धव ठाकरेंनी INDIA आघाडीत कोणत्याही अटी-शर्ती नसल्याचे सांगितले. बिहार निवडणुकांमध्ये मतदारांना ओळख सिद्ध करायला लागल्याने देशात अघोषित NRC लागू झालाय का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच, मतदार यंत्रातून VVPAT काढण्यावरही त्यांनी टीका केली आणि निवडणुका घेण्याचा फार्स कशाला, असे विचारले. दिल्ली दौऱ्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर हल्ला चढवला. पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यावरूनही त्यांनी टीका केली. उद्धव ठाकरेंनी खासदारांना जनहिताच्या मुद्द्यांवर सरकारला सळो की पळो करून सोडण्याचे आदेश दिले. जनतेच्या प्रश्नांशी सरकारला काहीही देणंघेणं नसून सत्ता हेच मोदी सरकारचं धोरण असल्याची टीकाही त्यांनी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola