Hasan Mushrif Ed Raid Pune : पुण्यातील ब्रिक्स इंडिया कंपनीबाहेरुन ग्राऊंड रिपोर्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल आणि पुण्यातील  घरांवर ईडीने छापेमारी केली. तसंच हसन मुश्रीफांच्या मुलीच्या पुण्यातील घरावरही छापा टाकण्यात आलाय.. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातल्या कथित १०० कोटी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी केली जातेय.. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर ही छापेमारी झाल्याचं सांगण्यात येतंय.. आज सकाळी सहा वाजल्यापासून ईडीने आपलं धाडसत्र सुरु केलं. या धाडसत्राची माहिती मिळाल्यानंतर मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांनी कागल बंदची हाक दिली. दरम्यान दुपारी २ वाजता मुश्रीफ आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत... या आधी 2019 ला हसन मुश्रीफ यांच्या घरावर आणि साखर कारखान्यावर ईडीने छापा टाकला होता.. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola