Good Touch Bad Touch | चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखायचा? स्वसंरक्षणासाठी शाळेत मुलांना धडे | पुणे | ABP Majha
दिल्लीतील निर्भया, हैदराबाद, उन्नाव, कोपर्डी प्रकरणानंतर आता देशातील महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तर चिमुकल्यांवर अत्याच्याराच्याही घटना दिवसेंदिवस उजेडात येत आहेत. तरी, य़ा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर शाळेत तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन वर्ग घेण्यात आला. त्यात त्यांना चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखायचा, स्वत:च्या संरक्षणासाठी कुठली खबरदारी घ्य़ायीच, यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आलं.