Pune | क्वॉरंटाईन सेंटरमधून पळून जाताना खिडकीच्या गजात अडकली तरुणी!

क्वॉरंटाईन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न पुण्यातल्या एका तरुणीला चांगलाच भोवला आहे. एरंडवणा भागात असलेल्या या क्वॉरंटाईन सेंटरमधून या तरुणीनं पळून जायचा प्लॅन केला होता. रात्री साडे अकराच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरच्या खिडकीच्या गजातून खाली जाण्याचा या तरुणीचा विचार होता, मात्र प्रत्यक्षात झालं उलटंच. पळण्याच्या प्रयत्नात ही तरुणी गजात अडकून बसली. बराच काळ प्रयत्न करूनही तिला बाहेर पडता येईना अखेर अग्निशमन दलाला पाचारण करावं लागलं. अग्निशम दलानं खिडकीचे गज कापत या तरुणीची सुटका केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola