Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 16 मार्च 2021 | मंगळवार | एबीपी माझा
Continues below advertisement
- कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यात नव्या गाईडलाईन्स, लग्नकार्यांसाठी 50 तर अंत्यसंस्कारांसाठी 20 जणांनाच परवानगी
- नियम पाळले नाहीत तर मुंबईत अंशत: लॉकडाऊन, महापौरांचा इशारा तर नागपूरमध्ये कडक लॉकडाऊन, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांवर निर्बंध तर खान्देशात अलर्ट
- राज्यात काल नव्या 15,051 कोरोना रुग्णांची नोंद, तर 48 रुग्णांचा मृत्यू; कोरोनाचा रिकव्हरी रेट 92.07 टक्क्यांवर
- नाशिकमध्ये पुढील आदेशापर्यंत मंगल कार्यालयं आणि लॉन्समध्ये लग्न सोहळ्यावर बंदी, आर्थिक नुकसानामुळे मंगल कार्यालय चालक-मालकांचा विरोध
- मनसुख प्रकरणात अधिकाऱ्याचा सहभाग असल्यास बदली करावी, राष्ट्रवादीच्या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुखांच्या सूचना,वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेंचं अखेर निलंबन
- दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रश्नपेढी उपलब्ध,एससीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध प्रश्नपेढीचा परीक्षेच्या तयारीसाठी फायदा
- सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रीति राज श्रॉफ आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त, मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात कारवाई
- गुरुवारपासून तीन दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणात पावसाची शक्यता
-
नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये दररोज 16,000 हापूस आंब्यांची आवक, पेटीला 1500 ते सहा हजार रुपयांचा दर
10. मोदी स्टेडियमवर होणारे भारत-इंग्लंड उर्वरीत टी-२० सामने प्रेक्षकांविनाच, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं गुजरात क्रिकेट असोशिएशनचा निर्णय
- नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये दररोज 16,000 हापूस आंब्यांची आवक, पेटीला 1500 ते सहा हजार रुपयांचा दर
- मोदी स्टेडियमवर होणारे भारत-इंग्लंड उर्वरीत टी-२० सामने प्रेक्षकांविनाच, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं गुजरात क्रिकेट असोशिएशनचा निर्णय
Continues below advertisement