Gangster Fake Passport | निलेश Ghaywal ला बनावट Passport प्रकरणी गुन्हा, अधिकारीही संशयाच्या भोऱ्यात

Continues below advertisement
पुण्यातील गुंड निलेश घायवळवर बनावट पासपोर्ट प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कोथरूडमधील गोळीबारानंतर निलेश घायवळविरुद्ध दाखल झालेला हा चौथा गुन्हा आहे. निलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि बनावट नावाचा उपयोग केल्याचे समोर आले आहे. त्याने २३ डिसेंबर २०१९ रोजी तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला होता आणि त्यासाठी नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बनावट पत्त्याचा वापर केला होता. तरीही, त्याला १६ जानेवारी २०२० रोजी पासपोर्ट मिळाला. त्यामुळे पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी आणि नगर पोलीस दलातील पोलीस अधिकारी संशयाच्या भोऱ्यात सापडले आहेत. या पासपोर्टचा उपयोग करून घायवळ तीन महिन्यांच्या व्हिसावर युरोपला गेला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, 'घायवळ आणि त्याच्या कुटुंबाला मिळालेले हे पासपोर्ट एका मोठ्या कटाचा भाग आहे आणि यामध्ये पासपोर्ट कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी देखील सहभागी असण्याची शक्यता आहे.' नगर पोलिसांनी 'नॉट अवेलेबल' असा शेरा दिला असतानाही, सहा वर्षे पासपोर्ट रद्द झाला नाही. पुणे पोलिसांचा तपास आता या कटाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola