Banjara Reservation | बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष तीव्र, राज्यभरात मोर्चे
Continues below advertisement
वाशिममध्ये बंजारा महंत सुनील महाराज यांनी हरिभाऊ राठोड यांच्या दसरा मेळाव्यातील वक्तव्याचा निषेध केला. हरिभाऊ राठोड यांनी बंजारा समाजाला एसटीमध्ये स्थान न मिळाल्यास उपहिंदू म्हणून राहू असे म्हटले होते. यावर सुनील महाराज यांनी "बंजारा समाज हिंदू धर्मातच राहणार. बंजारा समाजाला वेठीस धरू नये" असे सुनावले. पोहरादेवीमध्ये हरिभाऊ राठोड यांना हातात झाडू घेऊन मंदिर स्वच्छ करण्याची शिक्षा देण्यात आली. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी परभणी, अहिल्यनगर आणि अकोट्यात महामोर्चे काढण्यात आले. या मोर्चांमध्ये बंजारा समाजाचे आमदार तुषार राठोड, राजेश राठोड, बाबूसिंघू महाराज सहभागी झाले होते. सरकारने मागणी पूर्ण न केल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. दरम्यान, दहा ऑक्टोबरला ओबीसी संघटनांकडून नागपुरात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट करण्याच्या मागणीला आदिवासी समाजाने तीव्र विरोध केला असून, भंडाऱ्यात आक्रोश मोर्चा काढला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement