Ganeshotsav Pune : बाप्पाच्या स्वागतासाठी पुणेकरांची लगबग

Continues below advertisement

Ganeshotsav Pune  : बाप्पाच्या स्वागतासाठी पुणेकरांची लगबग 

राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganeshotsav) धामधूम पाहायला मिळत आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने लाडक्या गणपतीच्या पूजा साहित्य आणि नैवेद्याच्या खरेदीसाठी बाजारांमध्ये सर्वत्र नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. फळे-फुले आणि लाडक्या बाप्पाला चढवला जाणाऱ्या आवडीच्या 21 भाज्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांच्या मागणीत मोठी वाढ (Increase demand for flowers) झाली आहे. यामुळं दरात देखील वाढ झाली आहे. याचा फुल उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे.   पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात फूल खरेदी करण्यासाठी गर्दी  आपला लाडका बाप्पा खुलून दिसावा यासाठी पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात फूल खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. झेंडू, गुलाब, चमेली अश्या विविध प्रकारची फुल आहेत. फुलांची मागणी वाढल्यामुळं दरात देखील मोठी वाढ झाली आहे. याबाबतची माहिती फूल मार्केटचे अध्यक्ष अरुण हरिभाऊ वीर यांनी दिली आहे.    बाजारात कोणत्या फुलाला किती दर?  झेंडू : 50 ते 80 रुपये किलो  शेवंती: 150 ते 200 रुपये किलो  गुलाब: 200 रुपायाला 20 फूल  अस्टर: 250 ते 300 रुपये किलो  बिजली : 200 ते 250 रुपये  लिली : 50 रुपये किलो  गुलछडी : 1400 रुपये किलो 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram