ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 07 September 2024

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 07 September 2024

राज्यभरात आज गणेशोत्सवाचा उत्साह.. जंगी मिरवणुकांसह गणपतींचं थाटात आगमन.. घरोघरी बाप्पाच्या प्रतिष्ठापनेची तयारी.. 

पुण्यात दगडूशेठ गणपतीला यंदा हिमाचलमधील मंदिराचा देखावा, जटोली शिवमंदिराची हुबेहूब प्रतिकृती,
तर बाप्पाचरणी भाविकाकडून एक कोटींचा हिरा अर्पण

गणरायाचं आगमन आनंदाचं, सुख- समाधानाचं पर्व घेऊन येवो, मुख्यमंत्री शिंदेंची बाप्पाकडे प्रार्थना तर पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचं आवाहन

देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह,
कोकणात पारंपरिक पद्धतीने बाप्पाचं आगमन, चाकरमान्यांची हजेरी

लाडकी बहिणीच्या योजनेवरून महायुतीत श्रेयवाद...ही योजना मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट, दादा भुसेंचा दावा...तर एसओपी करण्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल...

महायुतीतला मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याचा निर्णय वरिष्ठ घेणार, त्याबाबत कुठलाही संभ्रम नाही...उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण.

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसाठी ही शेवटची निवडणूक, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य, तर, भाजपला पुन्हा निवडणुकाच घ्यायच्या नाहीत का, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर... 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola