Ganeshotsav 2021 : गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात कलम 144 लागू; 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान जमावबंदी
गणेशोत्सवाच्या काळात गर्दी होऊ नये म्हणून पुण्यात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी याबाबतचे आदेश जारी केलेत. गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते मात्र गेल्या वर्षीपासून कोविडचं संकट कायम आहे. अशातच गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जमावबंदी लागू करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.