Ganeshotsav 2020 |पुण्यात मानाचे पाच गणपती मंडळ देखावा उभारणार नाही,मंदिरातच मूर्ती बसवण्याचा निर्णय
Continues below advertisement
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्यापणाने साजरा केला जातोय. पुणे शहरही त्याला अपवाद नाही. यंदा पुणे पोलिस आणि महापालिका प्रशासनाने काही नियम, अटी लागू करून गणेशोत्सव साजरा करा असं आवाहन केलं आहे. यामध्ये ज्या मंडळांना शक्य असेल अशांनी त्यांच्या मंदिरातच गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन केलं आहे. त्याला प्रतिसाद देत अनेक मंडळानी गणेशोत्सव मंदिरातच साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र मानाच्या पाच गणपती मंडळांनी दरवर्षीप्रमाणे मंडपात गणेशोत्सव साजरा करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी मंडप उभा करायला सुरुवात देखील केली आहे. साधारण 10 बाय 15 फुटांचा मंडप असणार आहे. या मंडपात दर्शनाला गणेशभक्तांना परवानगी देण्यात आली नाही. यंदा कोणताही देखावा उभारण्यात येणार नाही.
Continues below advertisement