Nishikant Kamat Passes Away | प्रख्यात दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता निशिकांत कामत यांचं निधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हैदराबाद : प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता निशिकांत कामत यांचं वयाच्या 50 व्या वर्षी निधन झालं आहे. अभिनेता रितेश देशमुख याने याबाबत ट्वीट करत माहिती दिली. सकाळपासूनच निशिकांत कामत यांच्या निधनाचं वृत्त प्रसारित आणि प्रकाशित होतं होतं. त्यानंतर हैदराबादच्या एआयजी रुग्णालयाने याचं खंडन करत दुपारी एकच्या सुमारास निशिकांत कामत यांच्या प्रकृतीसंदर्भात मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध केलं होतं. निशिकांत कामत सध्या व्हेंटिलेटवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं रुग्णालयाने स्पष्ट केलं होतं. मात्र निशिकांत यांची मृत्यूशी झूंज अखेर संपली आहे.