Ganesh Chaturthi 2021 : गणपती बाप्पा मोरया! उत्साहपूर्ण वातावरणात पुण्यात गणरायाचं आगमन
आज गणेश चतुर्थी. राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन होत आहे. यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या सावटात पार पडत आहे. अशातच पुण्यातही कोरोना नियमांचं पालन करत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मानाच्या गणपतींपैकी एक असणारा केसरी वाडा गणपती मंडळही नियम पाळत गणेशोत्सव साजरा करत आहे.