CM on Rane काही जुन्या व्हायरसमुळे साईड इफेक्ट होतायत,मुख्यमंत्र्यांचा नाव न घेता राणेंना सूचक इशारा

Continues below advertisement

मुंबई : शिवसेना विरुद्ध नारायण राणे या संघर्षाचा दुसरा भाग पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. कारण नारायण राणे उद्यापासून जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा सुरू करत आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसाची ही यात्रा असेल.

नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेनंतर जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा भाग सुरु ठेवण्याचा निर्धार भाजपा आणि नारायण राणे यांनी केला आहे. त्यामुळे कोकणात खास करून नारायण राणे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध राणे हा संघर्ष तीव्र होऊ शकतो. नारायण राणे तिसऱ्या टप्प्यात तीन दिवसाची जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. त्यातील दोन दिवस सिंधुदुर्गमध्ये असतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन करण्याचा भाजपचा इरादा आहे. एकीकडे भाजपनं जन आशीर्वाद यात्रा सुरु ठेवण्याचा निर्धार केला असतानाच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना मधून नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram