PUNE | अवैधरित्या सावकारी करणाऱ्या चित्रपट दिग्दर्शक शंतनू पांडेला अटक
Continues below advertisement
अवैधरित्या सावकारी करणाऱ्या दिग्दर्शक व नाट्य लेखकाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. त्याने रावेतमधील खासगी रुग्णालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करणाऱ्या तरुणाकडून व्याजापोटी लाखो रुपये घेतले आहेत. खंडणी विरोधी पथक दोनने अटक केली आहे. याप्रकरणी शंतनू वसंत पांडे (वय 45, रा. वारजे) असे अटक केलेल्या या दिग्दर्शक व नाट्य लेखकाचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रविराज साबळे (वय 36) यांनी तक्रार दिली आहे.
Continues below advertisement