Pune : अकोले येथील अगस्ती सहकारी कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन, थकीत पेमेंटची प्रमुख मागणी
अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी कारखान्याच्या कारभाराविरोधात साखर आयुक्त कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी आंदोलन केले, शेतकऱयांचे थकीत पेमेंट देण्याची प्रमुख मागणी या शेतकऱ्यांची आहे.शिवाय निवृत्त न्यायाधीशामार्फत कारखाण्याची चौकशी करण्याची मागणी यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी केलीय. तसेच कारखाना कर्जमुक्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. भाजप नेते मधुकर पिचड सध्या कारखान्याचे चेअरमन आहेत. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी साखर आयुक्त कार्यालयाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.