Pandharpur : ऋतुमानानुसार पंढरपूरात विठ्ठल-रुक्मिणीला आजपासून उबदार पोशाख, काय आहे परंपरा
Continues below advertisement
ऋतुमानानुसार पंढरपूरात विठ्ठल-रुक्मिणीला आजपासून उबदार पोशाख परिधान करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्रक्षाळपुजेनंतर देवाला उबदार कपडे घातले जातात. पंढरपूरला सकाळी देवाची काकड आरती झाल्यानंतर उब देण्यासाठी देवाला मऊ काश्मिरी शाल आणि डोक्याला रेशमी मुंडासे बांधण्यात येते. यामागे देवाला थंडी वाहू नये ही भावना असते. त्यानंतर उबदार पोषाखांवरच पारंपारिक दागिने घातले जातात. जसं हिवाळ्यात थंडीपासून रक्षण केलं जातं तसेच उन्हाळ्यात देवाला पांढरे कपडेही घातले जातात.
Continues below advertisement