Pune By Elections : पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस, दिग्गज नेते पुण्यात दाखल

Continues below advertisement

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत... त्याआधी रोड शो करुन, सभा घेऊन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय नेत्यांकडून केला जाणार आहे..  कसबा आणि चिंचवड निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जातेय...त्यामुळे प्रचारासाठी दोन्ही बाजूचे दिग्गज नेते पुण्यात कालपासून तळ ठोकून आहेत. सर्वच पक्ष ताकदीनिशी प्रचार सभा, बाईक रॅली आणि पदयात्रेवर भर देतायत... कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार सुरु आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्यासाठी भाजप तसंच महाविकासआघाडी जोर लावतेय.. शिवाय बंडखोर राहुल कलाटे यांचाही जोरदार प्रचार सुरु आहे. पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर  2 मार्चला मतमोजणी आहे.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram