Shirur Lok Sabha : एकनाथ शिंदे-अजित पवारांची बैठक, शिरुर लोकसभेबाबत चर्चा झाल्याची शक्यता
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवसस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत बैठक पार पडली.. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे, दिलिप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आणि इतर मतदार संघातील नेतेमंडळी देखील उपस्थित होते.. त्यामुळे या बैठकीत शिरूर लोकसभा मतदार संघाची चर्चा झाल्याची शक्यता आहे... शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरुरमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत.. शिवाजीराव आढळराव पाटील सध्या शिवसेनेत आहेत.. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आलाय.. अजित पवार गट खासदार अमोेल कोल्हेंना आव्हान देण्यासाठी उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत.. या बैठकीआधी अढळराव पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिलीय.. पाहुयात..
Continues below advertisement