Doctor on Pune Helicopter Crash : हेलिकॉप्टर कोसळं! घटनास्थळी पोहोचलेल्या डॉक्टरांनी काय पाहिलं?

Continues below advertisement

Doctor on Pune Helicopter Crash : हेलिकॉप्टर कोसळं! घटनास्थळी पोहोचलेल्या डॉक्टरांनी काय पाहिलं?
पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडलीये... या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा या अपघातात मृत्यू झालाय... पायलट पिल्लई आणि पायलट परमजीत अशी मृतांची नावं आहेत...मह्त्तवाची बाब म्हणजे हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना घेऊन उड्डाण करणार होते.. मात्र मुंबईत पोहचण्याआधीच या हेलिकॉप्टरचा अपघात झालाय.. दिल्लीच्या हेरिटेज कंपनीचं हे हेलिकॅाप्टर होतं..एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे. येथील हेलिपॅडवरुन आज सकाळी साडेसात वाजता या हेलिकॉप्टरने उड्डाण केलं होतं. मात्र, हा भाग डोंगराळ असल्याने येथे धुकं होतं. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती मिळतेय.. अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरने लगेच पेट घेतला आणि त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.  बावधन बुद्रुकमधील ऑक्सफर्ड काऊंटी आणि एच.ई.एम.आर. एल. संस्था या परिसरातहे हेलिकॉप्टर कोसळलं
पुण्याहून मुंबईत जुहूच्या दिशेनं जाणाऱ्या या हेलिकॉप्टरला अपघात झालाय..  हेरिटेज एव्हिएशन कंपनीचं हे हेलिकॉप्टर 
असल्याची माहिती आहे... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram