Pune : धक्कादायक! दौंड तालुक्यात MPSCच्या विद्यार्थ्याची नैराश्यातून आत्महत्या

दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथे एमपीएससीची परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थीने आत्महत्या केल्याची दुदैवी  घटना घडली आहे.  मल्हारी नामदेव बारवकर असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. मल्हारी हा 25 वर्षांचा होता. मल्हारी हा एमपीएससीच्या पुर्व परीक्षेची तयारी करत होता, त्याने दोन तीन परिक्षेचे पेपर ही दिले होते. आज त्याने नैराश्यात जाऊन राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र  आत्महत्या केली. मल्हारी हा गरीब घरातील मुलगा होता. मल्हारीचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात मैलकोली आहेत. नैराश्य पोटी ही आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती मिळत असुन यवत पोलीस पुढील तपास करीत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola