Pimpri Accident : चुकीच्या बाजूनं दुचाकी चालवणं जीवावर, दुचाकीस्वाराचा ट्रेकखाली येऊन मृत्य
Continues below advertisement
वाहनं चुकीच्या मार्गानं चालवू नका अशा वारंवार दिलेल्या सूचना न पाळल्यानं पिंपरी चिंचवडमध्ये एका दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागलाय. अपघाताची ही सीसीटीव्ही दृश्यं समोर आली आहे. रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या चारचाकीतून उतरण्यासाठी एका व्यक्तीनं अचानक दार उघडलं मात्र त्याचवेळी राँग साईनं येणाऱ्या दुचाकीला या दाराचा धक्का लागला आणि दुचाकीवरचे दोघंहीजण खाली कोसळले. त्याचवेळेला बाजूनं जाणारा एका वेगवान ट्रक एका दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून गेला. त्यात या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. यात चुकीच्या बाजूनं गाडी चालवणं, चुकीच्या बाजूनं गाडी पार्क करणं, डाव्या बाजूनं ओव्हरटेक करणं अशा गुन्ह्याखाली दुचाकी, चारचाकी आणि ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement