Mumbai Congress अध्यक्ष भाई जगताप यांची हायकमांडकडे तक्रार: ABP Majha

Continues below advertisement

भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसची सूत्रे हाती घेताच पक्षातील मगरळ दूर करून आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पक्ष संघटन भक्कम करण्यावर त्यांनी भर दिला आहे. असे असतानाच जगताप यांच्या कार्यपद्धतीवर आमदार झिशान सिद्दीकी यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून याबाबत थेट पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे. दरम्यान, जगताप यांनीही काँग्रेसमध्ये लोकशाही असल्याचे नमूद करत झिशान यांना खडेबोल सुनावले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram