SSR Case | सुशांत सिंग आत्महत्येच्या सीबीआय तपासाला वेग, सुशांतच्या अपार्टमेंटची सीबीआयकडून पाहणी

मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. सीबीआयची टीम सुशांतच्या घरी पोहोचली आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयची टीम सीन ऑफ क्राईम रिक्रिएट करणार आहे. यासाठी सीबीआयने सर्व सामानही सोबत आणलं आहे. यावेळी सीबीआयने मुंबई पोलिसांच्या टीमला बाहेर उभं राहण्यास सांगिलं आहे, अशी माहिती मिळत आहे.

सीबीआय अधिकार्‍यांकडून सुशांत राहत असलेल्या अपार्टमेंटची पाहणी सुरु आहे. काही अधिकाऱ्यांनी इमारतीच्या शेवटच्या फ्लॅटवरील गच्चीवर जाऊन देखील संपूर्ण परिसराची पाहणी केली आहे. सुशांत राहत असलेल्या खोलीत फॉरेन्सिक लॅब डॉक्टर्सही पोहोचले आहेत. सीबीआयच्या टीमने सिद्धार्थ पिठानी, दीपेश आणि नीरज यांना सोबत आणलं आहे. घटना घडली त्यावेळी सिद्धार्थ, दीपेश आणि नीरज सुशांतसोबत उपस्थित होते

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola